भुसावळ – भारतीय जनता पक्षाने जिल्हा बँक निवडणूकीत आर.पी.आय ( ए ) गटाला एक जागा सोडावी अशी मागणी रिपार्इं खान्देश अध्यक्ष लक्ष्मण जाधव व युवाजिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रवी सपकाळे यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. या निवडणुकीत जागा न सोडल्यास स्वबळावर लढविल्या जातील, असा इशाराही भाजपला रिपार्इंने दिला आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट)तर्फे राजकीय, शासकीय निवडणूका लोकसभा विधानसभा सोबत युती करुन लढवत आहोत. सर्व पक्षीय बैठकीमध्ये रिपाईंला कोणतेही निमंत्रण न देता दुर ठेवले तरी होणा-या जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भाजपने आरपीआय गटाला विश्वासात घेवून जिल्हा बँकेच्या निवडणूकीची एक जागा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया ( आठवले गट ) तर्फे लढवायची आहे. तरी भाजपने पक्षश्रेष्ठीचा निर्णय घेवून रिपार्इंला एक जागा सोडण्यात यावी व रिपार्इं गटाला विश्वासात घ्यावे , अशी मागणी रिपार्इंने केली आहे. सर्व पक्षीय निवडणूक जिल्हा बँकेची झाली तर भाजपाने रि.पा.ई.गटाला कोणतीही एक जागा सोडावी जागा न सोडल्यास रिपार्इंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वेंâद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे आदेशाने रिपार्इं जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक ठाम पणे स्वबळावर लढवणार
सर्व प्रथम जिल्हा बँकेच्या होणा-या निवडणूकीत भाजपाने युती असल्यामुळे रिपार्इंला विश्वासात घेवून रिपार्इंला एक जागा देण्यात यावी
याबाबत माजी मंत्री आ. गिरीष महाजन व भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांचे सोबत चर्चा झालेली आहे.

तसेच माजी मंत्री महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.भोळे व आ. संजय सावकारे यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आर.पी.आय, जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, कार्याध्यक्ष लक्ष्मण जाधव पत्र देवून चर्चा करणार आहेत, असे रिपार्इंचे खान्देश अध्यक्ष लक्ष्मण जाधव व युवा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रवी सपकाळे यांनी सांगितले.
सर्व पक्षीय निवडणूक जिल्हा बँकेची झाली तर भाजपाने रि.पा.ई.गटाला कोणतीही एक जागा सोडावी जागा न सोडल्यास पक्षाचे अध्यक्ष ना. रामदास आठवले यांचे आदेशाने रिपार्इं जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक ठामपणे लढवणारच भुसावळ नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्व निवडणूका स्वबळावर लढवणार असल्याचा इशारा खान्देश अध्यक्ष जाधव व युवा जिल्हाध्यक्ष सपकाळे यांनी दिला आहे. या परिषदेत आरपीआयचे रमेश मगरे, खान्देश अध्यक्ष लक्ष्मण जाधव, युवा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रवी सपकाळे, जिल्हा उपाध्यक्ष शरद सोनवणे, तालुकाध्यक्ष बाळू सोनवणे, विश्वास खरात, सुनील देवरे, गोरख सुरवाडे आदी उपस्थित होते.


