भुसावळ :- टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची २० वी १९ वर्षाच्या आतील व ६ वी सीनियर मुला/मुलांची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा अमरावती येथे १२ ते १४ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणार आहे़, सदर स्पर्धेकरिता जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड ८ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी १ वाजता नाहाटा कॉलेजच्या मैदानावर भुसावळला होणार आहे, १९ वर्षवयोगटसाठी १ जानेवारी २००२ नंतर जन्मलेल्या इच्छुक खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे ,

अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा महासंघटना चे अध्यक्ष प्रा.आ. चंद्रकांत सोनवणे, डॉ. प्रदीप तळवलकर, शकील पटेल ,प्रा. आनंद उपाध्याय ,निना कटलर, गोपाल जोनवाल रमण भोळे, प्रदीप साखरे, बी एन पाटील, राजू कुलकर्णी, मधुकर वाणी, अजय डोळे, मेघशाम शिंदे, राहुल कोळी, प्रतिक कुलकर्णी, तारीख अहमद यांनी केले आहे.


