महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सावदा यांच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांना “एक हात कर्तव्याचा, एक हात मदतीचा “

सावदा – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सावदा यांच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांना “एक हात कर्तव्याचा, एक हात मदतीचा “म्हणून पूरग्रस्तांना सावरण्यासाठी मदत रवाना करण्यात आली आहे . नुकत्याच झालेल्या पावसाने कोकणातील महाड, चिपळूण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या महापुराने मोठे नुकसान केले आहे. यात वित्तहानी सह जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. यात अनेकांना आपला जीव याठिकाणी गमवावा लागला आहे. शेतकरी बांधवानी देखील आपली जनावरे गमावली. अशा चहूबाजूनी असलेल्या संकटाचा सामना आपले बांधव करीत आहे.


या पूरग्रस्तांना सावरण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने “एक हात कर्तव्याचा, एक हात मदतीचा” असे आवाहन करीत खारीचा वाटा उचलला आहे.
या उद्ध्वस्त संसारांना सावरण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाने दिपक सपकाळे, प्रमोद सोनवणे, चेतन निंबोळकर, शरद कुलकर्णी, भूषण महाजन, हेमंत सोनार हे जीवनावश्यक वस्तूं, आरोग्यासाठी गोळ्या व औषधंसह एक ट्रक घेऊन कोकणाच्या दिशेने आज रवाना झाले.