भुसावळ :- शहरातील हॉटेल निसर्ग जवळ शिरपूर कन्हाळा रोड भुसावळ येथून महिला घरी जात असतांना महिलेच्या पाठीमागून दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याची चैन व काळ्या रंगाची मोत्याची पोत गळ्यातून घेऊन गेल्याची घटना घडली होती त्याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आरोपीस अटक करण्यात आली होती. त्या गुन्ह्यातील महिलेचा मुद्देमाल आज रोजी बाजारपेठ ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन मुन्शीने परत केला आहे.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला कस्तुराबाई काशिनाथ इंगळे वय ७४ वर्षे राहणार तुकाराम नगर भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २३/४/२०२१ रोजी ११ वाजेच्या सुमारास हॉटेल निसर्ग जवळ शिरपूर कन्हाळा रोड वर भुसावळ या ठिकाणी महिला ही त्यांच्या घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून दोन अज्ञात चोरटे महिलेच्या गळ्यातील मोत्याची पोत ओधुन पोबरा केला होता त्याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरनं १६७/२०२१ भादवि कलम ३९२,४११,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन तोफिक हुसेन जाफर हुसेन याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील आरोपी सोहेल अली युसुफ अली हा फरार असून याचा शोध घेणे सुरू आहे. सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हा तोफिक याने हरिश्चंद्र दत्तात्रय इखणकर राहणार सराफ गल्ली भुसावळ यांस विकला चोरीची मालमत्ता स्वीकारल्याचने सदर गुन्ह्यात सराफ यासअटक करण्यात आली होती.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी महिला यांना आज रोजी ३०/७/२०२१ रोजी मुद्देमाल मुंशी यांच्याकडून गुन्ह्यात मिळालेला मुद्देमाल एक सोन्याची लगड ९.४७० ग्रॅम वजनाची ३०, ४५५ रुपये किमतीची फिर्यादी महिला यास कस्तुरबाई काशिनाथ इंगळे यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. सदर पुढील गुन्ह्याचा तपास माननीय उपविभागीय अधिकारी सो वाकचौरे साहेब तसेच पोलीस निरीक्षक भागवत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला पोलीस शिपाई गजानन वाघ करीत आहे.


