भुसावळ विभागातील पोलीस दलात पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांचा डीवायएसपी वाघचौरेच्या हस्ते सत्कार :


भुसावळ –
भुसावळ विभागातील पोलीस दलात पदोन्नती मिळालेल्या 16 अंमलदारांचा उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी दिनांक 19 जुलै 2022 रोजी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार यांचे पदोन्नती आदेश जारी केले आहे. भुसावळ पोलीस उपविभागातील 16 पोलीस अंमलदारांना या आदेशान्वये पदोन्नती देण्यात आलेली आहे. या पदोन्नती मध्ये पुढील पोलीस अमलदार यांचा रशीद तडवी , इब्राहिम तडवी , इक्बाल सैय्यद शेख , रवींद्र बोराडे , विजय पोहेकर , प्रेमचंद सपकाळे , चंद्रभान बोदडे ,आत्माराम भालेराव , संकेत झांबरे , श्रीकृष्ण देशमुख ,
रवींद्र तायडे , राहुल चौधरी ,
विकास सातदिवे , सोपान पाटील
समाधान पाटील यांचा समावेश आहे .
पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदार यांचा भुसावळ शहर पोलीस स्टेशन कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पोलिस दलातील पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सदर सत्कार प्रसंगी पदोन्नती मिळालेले सर्व पोलीस अंमलदार, याशिवाय भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब  ठोंबे,  बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दूनगहू याशिवाय भुसावळ शहर पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.