यावल येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;


जळगांव –
यावल येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास कट्टयासह जळगाव स्थानिक गुन्हे पोलिसांनी कारवाई करीत आज मंगळवार रोजी ताब्यात घेतले आहे . यावल शहरातील सुंदर नगरातील एक तरुण गावठी कट्टा कमरेला लावून बाळगत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा जळगांव निरीक्षक यांना मिळल्यावरून त्यांनी पथकाला याबाबत कारवाईचे आदेश देऊन घटनास्थळी रवाना करून गावठी कट्टयासह आरोपीस ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी की,आज दिनांक 27/07/2021 रोजी
पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार संशयीत आरोपी यश राजेंद्र पाटील राहणार सुंदर नगरी यावल यांचे जवळ गावठी कट्टा असून तो बाळगत असल्याबाबत सूचना मिळाली . त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन,सहाय्यक फौजदार शरीफ काझी ,पो.ना.युनुस शेख, पोना किशोर राठोड,पोकाँ. विनोद पाटील , पोकाँ रणजित जाधव यांचे पथकास मार्गदर्शन व सूचना देवून रवाना केले होते.त्यानुसार या पथकाने यावल येथे जाऊन सापळा रचून यश राजेंद्र पाटील यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून अंगझडती घेतली आरोपी यश राजेंद्र पाटील वय 20 राहणार सुंदर नगरी यावल यांच्या कडून 20000 रूपये किमतीचे एक गावठी कट्टा असा मुद्देमाल मिळून आला आहे
या प्रकरणी यावल पो.स्टे.भाग 6. गु.र.न. 85/2021 अर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीस वैद्यकीय तपासणी करून मुद्देमाल सह पुढील कायदेशीर कारवाई साठी यावल पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.