भुसावळात गुरुपौर्णिमेनिमित्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांनी वाहिली आदरांजली ;


भुसावळ –
समस्त शिवसैनिकांचे आराध्य दैवत गुरु हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भुसावळातील शिवसैनिकानी गुरुपौर्णिमेंनिमित्त गुरुवंदना देवून मानवंदना दिली .
गुरुपोर्णिमा म्हणजे शिवसैनिकांकरीता सण उत्सव होय. कारण सर्वांचे गुरु वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होय.आपल्या आराध्यास गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने शिवभोजन केंद्र भुसावळ येथे सकाळी बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून गुरुवंदना करण्यात आली .
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक
विलास मुळे , प्रा. उत्तमराव सुरवाडे ,शिवसेना नगरसेवक
मुकेश गुंजाळ ,शहर प्रमुख
नीलेश महाजन , शहर प्रमुख विजय सुरवाड़े ,ज्येष्ठ शिवसैनिक शरद जोहरे , यांच्या हस्ते करण्यात आले .,कट्टर शिवसैनिक तथा शिवभोजन केंद्र संचालक आयोजक उमाकांत (नमा)शर्मा आदि उपस्थित होते.


यानिमित्त गोर-ग़रीब, गरजू लोकांना शिवभोजन सोबत गोड़वा म्हणून बूंदी लाडू देण्यात आले.
बाळासाहेब यांना अभिप्रेत असलेले महाराष्ट्र घडविण्यासाठी व त्यांचे स्वप्न पूर्ण करूंन उद्धव साहेब यांनी शिवभोजन योजना कोरोनाच्या पार्श्वभूमि वर घेतलेला योग्य निर्णय आहे . साहेब बोलले होते आमचे सरकार आल्या वर सर्वात स्वस्त जेवण देवू आणि ते स्वप्न साकार झाले.असे मनोगत यावेळी आयोजक व शिवभोजन केंद्र संचालक शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा यांनी व्यक्त केले.