l
यावल – कार वर वाळलेले झाड कोसळल्याने झालेल्या विचित्र अपघातात यावल तालुक्यातील अट्रावल येथील मुळ रहिवासी तथा नाशिक येथील शिक्षक यांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली .
नितीन सोमा तायडे ( वय ३२) यांचे वलखेड ( जि. नाशिक) फाट्यावर रस्त्याच्या कडेला असलेले वादळी वारा आणि जोरदार पावसाच्या गोंधळात वाळलेले झाड त्यांच्या कारवर कोसळून झालेल्या विचित्र भिषण अपघातात त्यांचे दुदैवी निधन झाले . ते पिंपरूळ जिल्हा नाशिक येथील आश्रमशाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत होते . त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, भाऊ, बहिण, मेहुणे असा परिवार आहे. त्यांचे मृतदेह नाशिकहुन त्यांच्या मुळ गावी अट्रावल येथे आणण्यात आले. सकाळी अट्रावल तालुका यावल येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले , मयत शिक्षक नितिन तायडे येथील बस आगारातील सेवानिवृत्त चालक सोमा तायडे यांचे पुत्र होत. तर अट्रावल मुंजोबा देवस्थान विश्वस्त समिती सदस्य दीपक तायडे यांचे बंधू होत. नितिन तायडे यांच्या अशा दुदैवी अकाली निधनामुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .



