बोहर्डी येथे विद्युत ताराच्या स्पर्शाने एकाचा मृत्यू


वरणगाव :
भुसावळ तालूक्यातील बोहर्डी बुद्रुक ॥ येथील शेतीत काम करीत असताना विद्युत खाबावरील तुटलेल्या ताराचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली

 याबाबत अधिक माहिती असे तालूक्यातील बोहर्डी ॥ येथील शोभाबाई सुरेश पाटील यांच्या मालकीचे हॉटेल सहेली मागील बाजूस असलेल्या शेत भास्कर रामचंद्र सावळे ( ४८ ) हे कसत होते दि १८ रविवार रोजी निममीत प्रमाणे शेतात येऊन कोळपणीचे काम करीत असताना  शेतात असलेल्या  विद्युत पुरवठा खंडित झालेल्या तारा शेतात पडलेल्या होत्या मात्र त्याच विद्युत  खाबाच्या शेजारी विद्युत प्रवाह असलेल्या तारा त्यावर पडलेल्या असल्याचे लक्षात न आल्याने त्याचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला
  या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पोलीस पाटील

शांताराम साहेबराव पाटील यांच्या खबरी वरून घटनेची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे