भुसावळ –
येथील सिंधी कॉलनी तील जय झुलेलाल मंदिरात चालिहा महोत्सव आज शुक्रवार 16 जुलै पासून सुरू होणार आहे हिंदू समाजाच्या भगवान झुलेलाल यांचे सर्वात मोठे उत्सव 16 जुलै पासून 25 ऑगस्ट पर्यंत 40 दिवस आहे. येथील मंदिरात पार पडणार आहे दररोज सकाळी साडेसात ते साडेआठ सायंकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान त्यांची पूजा व आरती व पल्लव होईल सर्वकार्यक्रम शासनाच्या नियमाचे पालन करून होणार आहेत. सिंधी बांधव झुलेलाल मंदिर भुसावळ फेसबुक वर लाईव्ह प्रोग्राम बघू शकतात अशी माहिती समाजाचे राष्ट्रीय प्रवक्ता दीपक चांदवानी यांनी दिली आहे.



