भुसावळ –
आज भुसावळ प्रांत कार्यालयामध्ये प्रलंबित वनदावे, रेशन , रोजगार आणि दिपनगर च्या राखेमुळे प्रदुषित ” विल्हाळे ” गांवची नदी, तलाव, जंगल या प्रश्नावर जिल्हा प्रशासन आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी प्रांत अधिकारी भुसावळ, फैजपूर . तहसीलदार भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर सोबत वन खातेचे अधिकारी हजर होत राष्ट्रीय नेत्या प्रतिभा शिन्दे, सचिन धांडे, चंद्रकांत चौधरी, भरत बारेला,कलीदर तडवी, दिपक काठे ईत्यादी हजर होते
सामुहीक वनदावे विल्हाळेसह इतर गावाचे
त्वरीत तयार करावे.
त्यानंतर वैयक्तीक दाव्या वर गांव वार चर्चा झाली . आणि ग्रामसभेने
पाठविलेले सर्व दावे ज्या दाव्यामध्ये दोन पुरावे आहे अगर केसेस झालेले सर्व दावे उपविभागीय समीतीने स्विकारावे, आवश्यक असलेल्या दाव्यातबारा अ करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले
रेशनवर चर्चा झाली आदिवासी ना त्वरीत रेशनकार्ड व प्राधान्य ने धान्य मिळालेच पाहीजे अशी मांगणी करण्यात आली . महाजनकोच्या राखेमुळे प्रदुषीत झालेल्या विल्हाळे गावची नदी, तलाव, जंगलमुळे या गांवाला रोजगाराची साधने दिपनगर प्रशासनानी उपलब्ध करुन विल्हाळेगांव राख मुक्त करून या गांवात स्थानिकांना रोजगार व सीएस आर निधी मघून विकासांची कामे मिळावी
महाजनकोच्या ठेकेदाराकडे कार्यरत सुरक्षा रक्षकगेल्या सहा महीन्यापासून बंद आहे . त्या सर्वाना विना अट नवीनएजन्सीमध्ये समाहुन घ्यावे ..



