भुसावळ तालुक्यातील किन्ही शिवारात हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त ; तालुका पोलिसांची कारवाई ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
तालुक्यातील किन्ही शिवारात आज 11 जून रविवार रोजी भुसावळ तालुका पोलीसांनी गावठी हातभट्टी दारू अड्डयावर धाड घालून दारू ड्रमसह कच्चे रसायन नष्ट करून अड्डा उध्वस्त केला आहे .
आज 11 जून रविवार रोजी भुसावळ तालुका पोलीसांनी किन्ही शिवारात 3. 45 वाजेचे सुमारास मधू सुदन चौधरी यांच्या विहिरी जवळ सार्वजनिक जागी संशयित आरोपी हिरु बुद्ध गवळी रा.शिवपूर कन्हाळा हा गावठी हटभट्टीची दारू गाळण्याचीे भटटी रचुन जळत्या चुलीवर हात भटटीची दारू गांंळतानां गूळ, मोह ,नवसागर मिश्रित कच्चे पक्के ससायन सह 09 ड्रम त्यात 1700 लिटर रसायण व गावठी हातभट्टीची 30 लिटर तयार दारू असे ड्रम सह अंदाजे किंमत 66, 700 रुपयाचे मालासह मिळुन आले . याबाबत त्याच्या विरुद्ध प्रोव्ही कायदा कलम 65 फ, ब, क, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सपोनि अमोल पवार पोहेकॉ संदीप बडगे पो.ना. का गणेश राठोड शिवाजी खंडारे पो कॉ विचवे यांनी केली आहे