–
यावल –
येथील सराफा व्यवसायीक तथा शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानावर दोन दिवसापुर्वी पडलेल्या शस्त्र दरोडयाच्या पार्श्वभुमीवर पक्षातील विविध पदधिकारी, पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या दुकानास भेट देवुन त्यांच्या कुटुंबास धिर दिला व पोलीस प्रशासन योग्य दिशेने कार्यवाही करीत त्या दरोडेखोरा पर्यंत पहोचेल अशा विश्वास व्यक्त केला .

दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख विलास पारकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान पाटील यांनी जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानास भेट दिली , यावेळी कवडीवाले यांच्या कुटुंबाशी उपस्थित मान्यवरांनी घडलेल्या घटने विषयी सविस्तर माहीती जाणुन घेतली व त्यांना धिर दिला या भेटीत शिवसेनेचे तालुका प्रमुख रवीन्द्र सोनवणे , शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शरद कोळी , युवा सेनेचे तालुका सरचिटणीस सचिन कोळी ,तालुका उपसंघटक पप्पु जोशी , युवा सेनेचे उप शहर प्रमुख पिंटु कुंभार , युवा सेनेचे शहर समन्वयक सागर बोरसे , युवा सेना सरचिणीस विजय पंडीत , शिवसेना विभाग प्रमुख योगेश राजपुत , सारंग बेहेडे , राजु श्रावगी, मयुर धोबी , भरत चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते


