रस्त्यावर चुली मांडत वरणगावात महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन :


भुसावळ –
गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्य तेलासह जीवनाश्यक वस्तूंच्या दरात मोठी दरवाढ झाल्याने या दरवाढी विरोधात तालुक्यातील वरणगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकार्‍यांनी रस्त्यावरच चुली पेटवून स्वयंपाक करीत केंद्र सरकारचा निषेध केला.
प्रसंगी इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत वरणगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या तर मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध
रॅलीचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी यांनी केले. बसस्थानक चौकामध्ये चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील , युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील उपस्थित होते. वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांना निवेदन देण्यात आले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष समाधान चौधरी, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष कैलास माळी, माजी नगरसेवक रवी सोनवणे, माजी नगरसेवक विष्णू खोले, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, महेश सोनवणे, राजेश इंगळे, इफ्तार खा मिर्झा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *