भुसावळ (प्रतिनिधी ) –

ट्रकचे टायर चोरी प्रकरणी तालुक्यातील फेकरी येथील दोघांच्या जळगाव एलसीबी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून सुमारे 75 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .
पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळालेल्या गोपणीय माहिती वरून भुसावळ येथून चोरीस गेलेले टायर हे संशयित आरोपी तस्लिम खान सलीम खान व योगेश तुकाराम बाविस्कर दोन्ही राहणार फेकरी तालुका भुसावळ यांचेकडे असल्याचे समजले . त्यानुसार श्री. बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन
सहाय्यक फौजदार शरीफ काझी, पो.ना.युनुस शेख, पो ना किशोर राठोड , पो काँ. विनोद पाटील , पो काँ रणजित जाधव,चालक पो कॉ.मुरलीधर बारी यांच्या पथकाला बुधवार दिनांक २९ रोजी सूचना आणि मार्गदर्शन करीत फेकरी येथे रवाना केले .
पथकाने फेकरी येथे संशयित आरोपी तस्लिम खान सलीम खान व योगेश तुकाराम बाविस्कर यांची चौकशी केली असता त्यांचेकडे टायर आढळून आले सदरचे टायर हे त्यांनी सुनील शिरसागर इंगळे रा. नवा नगर खामगाव नाका, बाळापूर , जिल्हा अकोला ह.मू.कपिल वस्ती वरणगाव , शाहरुख बिसा कुरेशी रा. फेकरि ता. भुसावळ यांचे कडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार दोघां आरोपी यांना फेकरी येथून ताब्यात घेतले कसून चौकशी केली असता नमूद 75000 रू. किमतीचे 05 टायर असा मुद्देमाल काढून दिला व
त्यांनी ते टायर गावर कंट्रक्शन कंपनी हरियाणा या कंपनीतून चोरले असल्याचे कबूल केले.म्हणून या दोघांना अधिक चौकशी करता ताब्यात घेतले .
दरम्यान टायर चोरी प्रकरणी भुसावळ तालुका पो.स्टे .भाग 5 गु. र. न. 117/2021 भादवी 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.जळगाव एलसीबी पथकाने सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणला असून दोघां आरोपीस वैद्यकिय तपासणी करून मुद्देमालासह भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.



