भुसावळ तालुक्यासाठी 10 रुग्णवाहिका मिळवण्याचा मानस -आमदार संजय सावकारे –

भुसावळ – तालुक्यासाठी 10 रुग्णवाहिका मिळवण्याचा मानस -आमदार संजय सावकारे – दहा रुग्णवाहिका मिळवण्याचा मानस असल्याचे आमदार संजय सावकारे येथे म्हणाले. देवा ग्रुप फाउंडेशन, फुलगाव शाखेकडून लोकांच्या सेवेत 27 जुन रोजी रुग्णवाहिकाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदारांनी उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत तरुण पीढी व्यसनाधीनतेकडे न जाता अशा समाज विधायक कार्यासाठी पुढे येत असल्याचे समाधान असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षस्थानी माजी सभापती राजेंद्र चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ विधानसभेचे आमदार संजय सावकारे, सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण, राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र चौधरी, प्रकाश नारखेडे, महेश सोनवणे, सचिन कदम, विलास महाजन, आशिष शिंदे उपस्थित होते. रुग्णवाहिकेचे लोकार्पण सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी रीबीन कापून केले. समाजसेवक महेश सोनवणे यांनी फुलगाव गावातील माजी सैनिकांचा उल्लेख करत गावाने देशसेवेसाठी मोठे योगदान दिल्याचे सांगितले. राजेंद्र साहेबराव चौधरी म्हणाले की, कार्यकर्त्यांनी समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करावे. भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली.


यशस्वीतेसाठी देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष तिरुपती चौधरी, सचिव वोमेश्वर (विशाल) चौधरी, खजिनदार किरण सोनवणे, बाळा सोनवणे, उमेश महाजन, मनोज जाधव, अमोल कोळी, महिला अध्यक्ष अनिता कोल्हे, उपाध्यक्ष योगीता बाऊसकर, सचिव सुमित्रा चौधरी, संघटक सोनिया पाटील, खजिनदार नंदा चौधरी, कार्याध्यक्ष मंगला झोपे, नलिनी पाटील, पुष्पा पाटील, शुभांगी पाटील यांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक देवा ग्रुप फाउंडेशन फुलगावचे सचिव वोमेश्वर (विशाल) चौधरी यांनी तर सूत्रसंचालन युवराज कुरकुरे व आभार बंटी सोनवणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *