पदोन्नतीमधील आरक्षण पुर्ववत सुरु करा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मागणी ; तहसीलदारांना निवेदन –


भुसावळ –
राज्य शासनाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्यात आले असून ते पूर्ववत सुरू करण्यात यावे अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले.

शासनाने 7 मे 2021 रोजी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे पदोन्नतीमधील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आरक्षण रद्द केले. यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविषयी असंतोष निर्माण होऊन भीतीचे वातावरण तयार झाले. त्या अनुषंगाने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी कर्मचाऱ्यांची ऑनलाइन सभा घेऊन राज्यभर संघटनांच्या वतीने तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना भुसावळच्या वतीने पदोन्नती मधील आरक्षण पूर्ववत सुरू करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी अशोक बाह्रे ,विलास तायडे, प्रदीप सोनवणे, प्रमोद खैरे , संतोष तायडे, रवींद्र मसाने, अशोक पवार, बाळू कोळी, विजय निंभोरे, समाधान जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *