जळगाव –
दादावाडी परिसरात प्रभाग 8 मध्ये विनामूल्य कोविड -१९ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सुरुवातीला जि, प व कृषी उत्पन्न बाजार माजी सभापती स्व, बळीराम दादा सोनवणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
नंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जळगाव शहराच्या महापौर जयश्री सुनील महाजन सार्वजनिक वाचनालयाचे व शिबिराचे उद्घाटन केले,
अध्यक्ष समाजसेविका व निर्भीड व्यक्तिमत्त्व असलेल्या सरिता कोल्हे यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला,
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एक महिला किती काम करेल आपण सारे नागरिकांनी सोबत साथ द्यायला हवी तरच शहराचा विकास शक्य आहे असे सरिता कोल्हे यांनी सांगितले.
शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या आपण ठामपणे सोडवू, या बाबतीत लोकांनी थोडे सहकार्य करून आपण एक चांगले व स्वच्छ शहर घडू शकते असे महापौर जयश्री महाजन म्हणाल्या .
याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले , सल्लागार , ऑल इंडिया शाहू ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिनदादा सैंदाणे, कुंदन सूर्यवंशी,नगरसेवक चंद्रशेखर पाटील ,वासुदेव पाटील हर्षाली पाटील ,ललित धांडे ,महेश राठी ,विजय लुल्ल्हे इंडियन रेडक्रॉस दिनेश तेजी,योगेश सपकाळे उपस्थिती लाभली,



