भुसावळ –

शहरातील जळगांव रोड येथील स्वामी विहार परिसरात गटरी आणि पाणी प्रश्न गंभीर बनलेला आहे. विस्तारित भागात ड्रेनेज, गटारी नाहीत. कामगार आणि नोकरदार वर्ग अधिक असल्याने वेळेत टॅक्स भरतात. साकेगाव ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने भुसावळ नगरपालिका लक्ष देत नाही, तर ग्रामपंचायतचा टॅक्स भरूनही ग्रामपंचायत प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायत अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे अश्या अनेक तक्रारी या भागातील नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंगळवारी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यलयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, शहरप्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा करणार आहेत.
आमच्या भागात साकेगाव ग्रामपंचयाच्या ढिसाळ कारभारामुळे समस्यांचे माहेरघर झाले असून, जेथे गटारी आहे, तेथे स्वच्छता नाही, काही भागात गटारी नाही. या समस्या न सुटल्यास ग्रामपंचायतीचे सर्व प्रकारचे अनुदान बंद करावे अशी मागणी करणार आहे…. सौ. चारुशीला बोदडे, स्वामी विहार, रहिवासी
या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, तरीही कामे सुरू केली नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष न घातल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करणार आहोत…. माजी नगरसेवक दीपक धांडे


