भुसावळ (प्रतिनिधी )-
जन्मोजन्मी हाच पती लाभो म्हणत पतीपरमेश्वराच्या दीर्घायुष्याकरीता वडाच्या झाडांचे रूढी व परंपरेनुसार पूजन करण्यात येवून आनंदात व उत्साहाने सण साजरा केला . कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मास्क लावा , स्वच्छ साबणाने हात धुवा ,सुरक्षित अंतर पाळा , सॅनीटाइजर वापरा असे संदेश देवून सुद्धा सुहासिनींनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाचे पूजन केले .
अनेक महिलांनी यानिमित्त वृक्षारोपण केले
नुकत्याच विवाह झालेल्या नववधू यांनीही वटसावित्री पौर्णिमेचे व्रत करीत हिंदू संस्कृति व परंपरा जोपासली .यावेळी आपल्या रूढी परंपरा आम्ही जोपासणारच त्याच बरोबर काळानुसार समाजाप्रती असलेल्या अमुलाग्र गरजा लक्षात घेवून त्या नियमांचे देखील पालन आम्ही करणार असल्याचे मत सौ प्रियंका मंदार बागुल या सुहासिनीने व्यक्त करीत वृक्षारोपण संगोपन करीत वृक्ष संवर्धन करणार असल्याचेही या वेळी सांगितले . यानिमित्त हळदी कुंकु व वाण (भेट ) म्हणून मास्क व सॅनिटाइजर देवून शुभेच्छा दिल्या .




