खंडाळा गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामसेवकाची केराची टोपली ; ‘तीन महिने उलटून हि माहिती मिळेना – ग्रा.स.प्रेमचंद सुरवाडे


भुसावळ –
तालुक्यातील खंडाळा
ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचाराची चौकशी व माहितीचा अधिकार हे अर्ज होताच खंडाळा ग्रामसेवक गेल्या दोन महिन्या पासून मेडिकल रजेवर गेला असून गटविकास अधिकारी यांनी खंडाळा ग्रामसेवकाला दहा दिवसाच्या आत माहिती द्या असे आदेश देऊन हि आजपावेतो कसलीच माहिती या ग्रामसेवकाने दिली नसून गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
सविस्तर माहिती अशी की माहितीच्या अधिकारा मार्फत खंडाला ग्रामसेवका कडे सुभाष जोहरे यांनी दिनांक १०/२/२०२१ रोजी २०१५ते २०२० या कालावधीतील चौदाव्या वित्त आयोगाची संपूर्ण माहिती मागतील होती या अर्जाची सुनावणी गटविकास अधिकारी यांच्या कडे पण झाली होती व गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना दहा दिवसांच्या आत ही माहिती द्या असे आदेश दिले होते तसेच दुसरा अर्ज माहितीचा अधिकारा मार्फत सुभाष जोहरे यांनी दिनांक ३०/३/२०२१ रोजी २०१५ ते २०२० या कालावधीत घरपट्टी, पानपट्टी व जमा खर्च नमुना नंबर ची सुद्धा झेरॉक्स मागतले होते याची पण सुनावणी व आदेश गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकास दिले होते तसेच शरद सुरवाडे यांनी २०१५ ते २०२० या कालावधीत मासिक प्रोसिडिंग व ग्रामसभेचा संपूर्ण बुकाची झेरॉक्स मागीतल्या होत्या माहितीच्या अधिकार मार्फत याची पण सुनावणी व आदेश दहा दिवसांत ग्रामसेवक याने द्यावा असे गटविकास अधिकारी यांनी दिले असल्यावर हि खंडाळा ग्रामसेवकानी गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला न जुमानता केराची टोपली दाखवली असून या सर्व सुनावणी झाल्या तेव्हा हा ग्रामसेवक गटविकास अधिकारी यांच्या दालनात गैरहजर होता.
माहितीच्या अधिकारा मार्फत एक महिन्याच्या आत माहिती द्यावी लागते मात्र याप्रकरणी 3 महिने उलटून ही ग्रामसेवक माहिती देत नसल्याने या ग्रामसेवकावर संबंधित अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

नाशिक येथे पुन्हा अपील करणार – गटविकास अधिकारी
खंडाळा ग्रामसेवकाला मी अर्जदाराच्या अर्जावर दहा दिवसात माहिती द्यावी असे आदेश दिले आहे, परंतु ग्रामसेवक यांनी माहिती न दिल्याने अर्जदार नाशिक येथे संबंधित खात्यात पुन्हा दुसऱ्यांदा अपील करणार असून त्या खात्यातील संबंधित अधिकारी या ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करतील.
दरम्यान ग्रामसेवक मेडिकल रजेवर असून ग्रामपंचायती बंद आहे असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले .
मात्र ग्रामसेवक हजर ।!!!
नेमका हा ग्रामसेवक कोणत्या ग्रामपंचायत मध्ये बसतो..? केव्हा येतो केव्हा जातो कुठं हजर राहतो..? खंडाळा ग्रामपंचायत मध्ये येतो तर गावकऱ्यांना का दिसत नाही. का हा फक्त कागदोपत्री पत्रे हजर असतो ..? याला नेमका कुणाचा छूपा आशीर्वाद मिळत आहे , या ग्रामसेवकावर कारवाई क़ाय होत नाही, ग्रामसेवक मेडिकल रजेवर असून सुद्धा हजर दाखवण्यात येत आहे . हजर आहे तर का अर्जाची माहिती का देत नाही आदीं प्रश्न ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे यांनी उपस्थित केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *