रोप बँक तयार करुन देशी वृक्षाचा राज्यभर प्रसार व्हावा – आमदार संजय सावकारे ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पर्यावरणाची समस्या गंभीर रुप धारण करीत असताना सर्वानी रोप बँक तयार करुन देशी वृक्षाचा राज्यभर प्रसार करावा, वृक्ष लागवड व संगोपन अत्यावश्यक असल्याचे मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले .
येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय शिक्षक, नाना शंकर पाटील व ज्येष्ठ नागरिक रघुनाथ सोनवणे यांनी तयार केलेल्या अडुळसा व गुळवेल रोपवाटिका बँक निर्मिति केल्याबद्दल सन्मानपत्र देताना प्रतिपादन केले ते पुढे म्हणाले प्रत्येका कडून झाडांची लागवड जागरूकपणे होते असे नाही पण आपण वेगवेगळ्या माध्यमांतून देशी व पर्यावरणाला पुरक झाडाची प्रचार प्रसिद्धी करत आहेत. त्याचप्रमाणे समाज्याच्या आरोग्याची काळजी म्हणून अडुळसा व गुळवेलचीही निर्मिती केली हे खूप मोठे कार्य आहे,
यावेळी जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक नाना पाटील यानी पर्यावरण संदर्भात दिशा दर्शक कार्य करण्यासाठी जर शासकीय जागा मिळाली तर लोकसमुहातून मोठया प्रमाणावर स्थिर कार्य ऊभे राहील तो उपक्रम सर्वांना मार्गदर्शक ठरेल असे सांगितले तर
ज्येष्ठ नागरिक अप्पा सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या सन्मानपत्र, अभिनंदन प्रसंगी डॉ. नि. तु.पाटील, आर्ट ऑफ लिव्हीगचे अमित असोदेकर व अन्य व्यक्ती उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *