प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुढील उत्सव विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचे ठरविले आहे. तपशील या प्रमानेे –

- 06067/06068 चेन्नई एग्मोर जोधपुर विशेष
06067 चेन्नई एग्मोर जोधपुर विशेष सेवा दि. ०३.०७.२०२१ ते ०६.११.२०२१ पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. आणि
06068 जोधपुर चेन्नई एग्मोर विशेष सेवा दि. ०५.०७.२०२१ ते ०८.११.२०२१ पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. - 06733/06734 रामेश्वरम ओखा विशेष
06733 रामेश्वरम ओखा विशेष सेवा दि. ०२.०७.२०२१ ते ०५.११.२०२१ पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. आणि
06734 ओखा रामेश्वरम विशेष सेवा दि. ०६.०७.२०२१ ते ०९.११.२०२१ पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.
उपरोक्त सर्व विशेष सेवा विद्यमान मार्गावर, वेळापत्रकाप्रमाणे आणि थांब्यांसह धावतील. *तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
*केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
*प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविद-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.



