भाजपा किसान मोर्चा भुसावळ तालुका अध्यक्ष पदी संजय पाटील यांची निवड ;


भुसावळ –
जळगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या बैठकीच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी भुसावळ तालुका किसान मोर्चा तालुका अध्यक्षपदी संजय निवृत्ती पाटील (साकेगाव तालुका भुसावळ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले .
प्रसंगी तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील, चिटणीस दिलीप कोळी , माजी सरपंच अनिल पाटील, साकेगाव प्रभारी सरपंच आनंद ठाकरे , ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे , माजी सदस्य संतोष भोळे ,आदींची उपस्थिती होती
संजय पाटील भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व सदन शेतकरी आहेत तसेच सामाजिक कार्यात कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव तत्पर व प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली
त्यांच्या निवडीबद्दल तालुक्याचे आमदार संजय सावकारे प्रमोद सावकारे पंचायत समितीचे सभापती वंदना ताई उन्हाळे शहराध्यक्ष परीक्षित ब-हाटे आदींनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *