बीएचआर प्रकरणी अकोल्यातून एकाला अटक !

बीएचआर प्रकरणी अकोल्यातून एकाला अटक !
जळगाव –
बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
अकोला येथून प्रमोद किसनराव कापसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आज गुरुवारी जिल्ह्यासह इतर ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केल्याचे मोठी खळबळ उडाली आहे.

याआधी सात आरोपींना अटक केल्यानंतर तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई) अशा अटक केलेल्या व्यक्तींची नाव आहेत. तत्पूर्वी पुण्यातील रिटझ कार्लटॉन या हॉटेलमधून ताब्यात घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *