भुसावळ विभागात ऑनलाईन पेन्शन अदालत संपन्न ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे, भुसावळ विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारीं संदर्भात आज दि. १५.०६.२०२१ रोजी मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात वर्ष २०२१ चे प्रथम ऑनलाईन पेन्शन अदालत आयोजित करण्यात आले.
पेन्शन अदालत मध्ये एकूण ६५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यात शंभर टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले. ज्यामध्ये रू. ६,५९,७९३/ – ची रक्कम देण्यात आली.
पेन्शन अदालतीचे मुख्य न्यायाधीश विवेक कुमार गुप्ता, मंडळ रेल प्रबंधक आणि मनोजकुमार सिन्हा, अपर मंडळ रेल्वे प्रबंधक तसेच लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी वीरेंद्र वडनेरे यांनी केले.
नाशिक पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस जी कुलकर्णी यांनी पेन्शनधारक व प्रशासनाच्या समस्या निवारणा संबंधी सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले.
या कोरोना काळातही प्रशासनाने पेन्शनर्स चे तक्रारीचे निराकरन केले. प्रशासनाने यांचे कौतुक केले. तसेच ६० वर्षा नंतरहि सभाचे पेन्शनर्सनि नविन तंत्रज्ञानाचा उपयोग केला म्हणून आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे धन्यवाद सहाय्यक कार्मिक अधिकारी बी एस रामटेके यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *