मुंबई आणि हावडा दरम्यान विशेष अतिजलद दुरांतो गाड्या आणि मुंबई -पाटणा विशेष सेवा पूर्ववत


१) रेल्वेने मुंबई व हावडा दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित विशेष अतिजलद दुरांतो गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल खाली दिलेल्यानुसार:
02095 दुरांतो विशेष दि. १३.६.२०२१ पासून ३०.६.२०२१ पर्यंत दर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १७.१५ वाजता सुटेल आणि हावडा येथे दुसर्‍या दिवशी २०.०५ वाजता पोहोचेल.
02096 दुरांतो विशेष दि. ११.६.२०२१ पासून २९.६.२०२१ पर्यंत दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी हावडा येथून ०५.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्‍या दिवशी ०८.१५ वाजता पोहोचेल.
थांबे : भुसावळ, नागपूर, रायपूर, बिलासपूर आणि टाटानगर.
संरचना : १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय वातानुकूलित व एक पेंट्री कार.
२) मुंबई -पाटणा विशेष सेवा पूर्ववत
रेल्वेने खालील विशेष गाड्यांच्या सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिलेल्या माहितीनुसार
ट्रेन क्रमांक 03260 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पाटणा द्वि-साप्ताहिक विशेष दि. १५.६.२०२१ पासून २.७.२०२१ पर्यंत दर शुक्रवार आणि मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.
ट्रेन क्रमांक 03259 पाटणा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष दि. १३.६.२०२१ पासून ३०.६.२०२१ पर्यंत दर बुधवार आणि रविवारी पटना येथून सुटेल.
टीप : या गाड्यांचा मार्ग, वेळ आणि थांबे यात कोणताही बदल राहणार नाही.
आरक्षण : पूर्णत: आरक्षित 02095 विशेष अतिजलद दुरांतो ट्रेनचे फ्लेक्सी शुल्कासह बुकिंग दि. १२.६.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *