भुसावळ शहरात कैदी व भिक्षुकांचे लसीकरण ! –

भुसावळ शहरात कैदी व भिक्षुकांचे लसीकरण ! –

भुसावळ –

शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी आजरोजी नगरपरिषदेतर्फे जेरबंद असलेले कैदी व बाहेर रस्त्यावर फिरणारे भिक्षुक यांना मा.जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशावरून कोविड शिल्डचे लसीकरण करण्यात आले.

भुसावळ मधील दुय्यम कारागृहातील ३० कैद्यांना कोविड शिल्ड लसीकरण देण्यात आले.तर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन बाजारपेठ पोलीस चौकी अंतर्गत या ठिकाणी रेल्वे स्टेशन व बस स्थानक भागातील रस्त्यावरफिरणारे भिक्षुकांचीअँटी रॅपिड टेस्ट करून कोविड शिल्ड लसीकरण करण्यात आले.तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशन जवळ नगरपरिषदे डॉक्टर तोशेष खान व स्टाफ व न.पा. उपमुख्याधिकारी महेंद्र कतोरे यांच्या आदेशाने होमगार्ड यांनी भिक्षुकांचा शोध पोलीस स्टेशन समोरील परिसरात तसेच छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलनातील भिक्षुकांची अँटी रॅपिड टेस्ट करून कोविड शिल्ड लसीकरण करण्यात आले. ३० कैदी व ४० भिकारी असे एकूण ७० जणांना कोविड शिल्ड लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रथमच भुसावळ शहरामध्ये असे प्रकारचे उपक्रम राबविण्यात आहे असावे.या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, सपोनि अनिल मोरे,कृष्णा भोये, संदीप गोंटला,गणेश धुमाळ,हरीष भोये व होमगार्ड अशांची उपस्थिती होती.या टेस्ट दरम्यान एकही कैदी किंवा भिकारी पॉझेटिव्ह आढळून आलेला नाही.अशी माहिती नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी तोशेष खान यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *