जळगाव जिल्ह्यात आज 102 नवीन कोरोना रुग्ण तर 312 रुग्णांची कोरोनावर मात


जळगाव –

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग सातत्याने कमी होत आहे. गत चोवीस तासांमध्ये १०२ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून ३१२ रूग्णांनी यावर मात केली आहे.

जळगाव शहर-२ , जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-५, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-४, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-४, एरंडोल-४७, जामनेर-४, रावेर-१, पारोळा-१, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण १०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यातच्या आजच्या आकडेवारीनुसार आजवर जिल्ह्यात १ लाख ४० हजार ९९४ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३५ हजार ६०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ८३८ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात १ बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *