तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार ;भुसावळातील घटना ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
उधारीने दिलेले पैसे मागीतल्याचा राग आल्याने दोघांनी तरुणाचे डोक्यात कु-हाडिने वार केल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी येथे घडली .
धिरज निळकंठ पाटील वय ३१ राहणार विठ्ठल मंदिर वार्ड, (हेमंत फालक यांचे घर)भुसावळ याने दिनांक 3/6/2021 रोजी दुपारी सीता बाविस्कर यांना २००० रुपये उधार दिले होते. पैसे परत मगितल्याच्या कारणावरून सीता बाविस्कर यांचे पती पूर्ण नाव माहीत नाही व बंटी बाविस्कर यांना राग आला व त्यांनी लोखंडी कुऱ्हाडीने धिरज पाटिल याच्या डोक्यावर मध्यभागी मारून दुखापत केली म्हणून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला धिरज पाटिल याच्या फिर्यादिवरुन आरोपी सीता बाविस्कर व बंटी बाविस्कर दोघां विरुद्ध गुरन 232/2021भा.द.वि.कलम 326,504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी बाबासाहेब ठोंबे यांच्या आदेशावरून संशयित आरोपी बंटी बाविस्कर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ नेव्हील बाटली करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *