नागपूर –

नागपूरच्या रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून ब्राऊन शुगर जप्त केली आहे, एका बेवारस बॅगमध्ये या ड्रग्जच्या पुड्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. नागपूर रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडी पोहोचली असता नियमित पेट्रोलिंगवर असलेल्या रेल्वे पोलिसांना जनरल बोगीमध्ये एक बेवारस बॅग दिसली, त्या बॅगबद्दल विचारपूस केली असता कोणीही त्यावर आपला हक्क सांगितला नाही. त्यामुळे ती बॅग ताब्यात घेऊन चेक केली असता त्यात छोट्या छोट्या पुड्या दिसून आल्या. त्यानंतर त्याची माहिती अमली पदार्थ विरोधी विभागाला देण्यात आली असता ते ब्राऊन शुगर असल्याचे समोर आले. त्या ३१० पुड्यांमधले ब्राऊन शुगरचे २१.४९० ग्रॅम वजन होते, त्याची बाजारात किंमत २ लाख १४ हजार ९०० रुपये असल्याचा अंदाज आहे. परंतु ही बॅग कोणाची होती आणि कोण याची तस्करी करत होता याचा शोध आता रेल्वे पोलीस घेत आहेत.


