भुसावळ (प्रतिनिधी )-
बेवारस स्थितीत सापडलेली वाहने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ८२ प्रमाणे जप्त
करण्याचे अधिकार पोलीसांना आहेत. त्यानुसार भुसावळ उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन मध्येअशी बेवारस वाहने जप्त करण्यात आलेली आहे. सदरची वाहने त्यांच्या मुळ मालकांना परत
देणे कामी त्यांचा मालकांचा सर्वोतोपरी शोध घेण्यात येवूनही त्यांचे मुळ मालक मिळून आले नाही.त्यामुळे अशी ही जप्त बेवारस वाहने वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या आवारात जीर्ण / बंद अवस्थेत पडून आहेत.
सदरच्या वाहनांवर मालकी हक्क सिध्द करु इच्छित असल्यास त्यांनी दि.१५.०६.२०२१ पूर्वी सबंधित पोलीस स्टेशन येथे आपले कडिल मुळ कागदपत्रासह हजर राहून आपली मालकी सिध्द करुन वाहन घेवून जावे.असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे .
बेवारस वाहनांमुळे पोलीस स्टेशन येणाऱ्या नागरीकांना थांबण्यास तसेच पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाजासाठी त्यामुळे जागेची
जागा देखील अडून पडली आहे. पोलीस स्टेशनमध्ये
अडचण होत आहे. शिवाय पोलीस स्टेशनचा परिसर देखील अस्वच्छ होत आहे.
उपरोक्त बाबींचा विचार करता उपलब्ध कायदेशीर तरतुदीनुसार अशा बेवारस
वाहनांचा लिलाव करुन विल्हेवाट लावण्याची परवानगी पोलीस अधीक्षक, जळगांव यांचे कडून
प्राप्त झाल्याने सदर वाहनांचा लिलाव करुन विल्हेवाट लावण्याचे व प्राप्त रक्कम शासन जमा
करण्याचे निश्चित केले आहे. विल्हेवाटी साठी पोलीस स्टेशन निहाय लिलाव करण्यात येणारी
वाहनांची संख्या पुढील प्रमाणे भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.
बेवारस वाहने ७०,
भुसावळ शहर पो.स्टे.
बेवारस वाहने ०५,
भुसावळ तालुका पो.स्टे. बेवारस वाहने १० ,
नशिराबाद पो.स्टे
४० बेवारस वाहने
सदरची लिलाव प्रक्रिया हि दि.१६.०५.२०२१ रोजी सकाळी १० वाजता पोलीस
वसाहत आर.पी.डी.रोड भुसावळ येथे घेण्यात येणार आहे.
तरी सदर लिलावात ज्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी दि.१३.०६.२०२१ पर्यंत
प्रभारी अधिकारी भुसावळ शहर यांचे कडे वा प्रभारी अधिकारी, नशिराबाद पो.स्टे. यांचेकडे लेखी
अर्ज आपले कडिल परवाना पत्रासह करावा.
यानुषंगाने कळविण्यात येते की, लिलावात देण्यात येणारी वाहने ही विल्हेवाट (स्नप)
करणे अपेक्षीत आहे. त्यांचा वापर हा कोणत्या परिस्थितीत पुन्हा वाहन म्हणून / दुरुस्ती करुन वा
अन्य प्रकारे करता
येणार नाही.
यानुषंगाने पुन्हा अद्यापही कोणी व्यक्ती सदरच्या वाहनांवर मालकीहक्क सिध्द करुन इच्छित असल्यास त्यांनी दि.१५.०६.२०२१ पूर्वी सबंधित पोलीस स्टेशन येथे आपले कडिल मुळ कागदपत्रासह हजर राहून आपली मालकी सिध्द करुन वाहन घेवून जावे.असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे .



