रुग्ण संख्येसह मृत्यूदरात घट : जळगाव जिल्ह्यात नव्याने 158 रुग्ण आढळले – चौघांचा मृत्यू – एकाच दिवसात 490 रुग्णांनी केली मात

ळगाव –
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येसह मृत्यूदरात घट होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. गत 24 तासात नव्याने 158 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात चार रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 490 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत दोन हजार 532 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात चार रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात चार रुग्णांचा मृत्यू ओढवला तर 24 तासात 490 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 39 हजार 985 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 31 हजार 874 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सोमवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 07 , जळगाव ग्रामीण 05, भुसावळ 14 , अमळनेर 06, चोपडा 02 , पाचोरा 16 , भडगाव 02 , धरणगाव 01, यावल 08, एरंडोल 19 , जामनेर 07 , रावेर 04 , पारोळा 02 , चाळीसगाव 47 ,
मुक्ताईनगर 02 , बोदवड 12 ,
अन्य जिल्हा 04

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *