भुसावळ –

आजच्या महिलांसह युवतीनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन अँड. जास्वंदी भंडारी (पाटिल ) यांनी 6 केले .भुसावळ तालुका मराठा समाजाच्या वतीने दि.31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 296 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भंडारी बोलत होत्या .
कोरोना च्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पध्दतीने नियमांचे पालन करीत जळगाव रोडवरील अहिल्याबाई यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करुन मराठा समाजाने जयंती साजरी केली. यावेळी
राजमाता यांनी पाणी प्रश्न अतिशय चांगला हाताळला ,एक आदर्श व्यक्तीमत्व होते असे म्हटले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या विशिष्ट समाजासाठी काम करणाऱ्या नव्हत्या तर संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी काम केले आहे . असे मत प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना यावेळी नाना पाटील सर यांनी व्यक्त केले . तर भुसावळ तालुका अध्यक्ष किरण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रसंगी अलका भगत, कृष्णा शिंदे, सचिन पाटील, रुपेश पाटील, राहुल पाटिल, सुमित देसले,लखन जगताप, महेंद्र बावस्कर ,शुभम शिंदे व इतर समाज बांधव उपस्थित होते .


