दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील सुरक्षारक्षकांचे सहा महिन्यापासून काम बंद ; सुरक्षारक्षकांची शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्याकडे धाव ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील सुरक्षारक्षकांचे सहा महिन्यापासून काम बंद असल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहे यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्याकडे या सुरक्षारक्षकानी न्याय मिळावा म्हणून धाव घेतली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिपनगर तालुका भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रात गेल्या अडीच वर्षापासून जवळपास अडीच वर्षापासून 165 सुरक्षारक्षक विविध एजन्सीमार्फत सुरक्षा राखण्याचे उत्तम कार्य करीत होते . परंतु औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर प्रशासनाने गेल्या सहा महिन्यापासून सुरक्षारक्षकांच्या कामाची निविदा प्रसिद्ध न केल्याने सदर सुरक्षारक्षकांना सहा महिन्यापासून कोविड १९ च्या परिस्थितीत रोजगारा विना हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे सदर सर्व दीडशे सुरक्षारक्षक घे येथील दीपनगर परिसरातील स्थानिक असून काही प्रकल्प बाधित आहेत दिपनगर प्रशासनाने जाणून-बुजून सदर सुरक्षारक्षकांच्या ठेका एम एस एफ या राज्यस्तरीय कंपनीला देऊ केला आहे त्यामुळे स्थानिकांचा रोजगार जाणार आहे सदर बाबतीत एक मार्च 2021 रोजी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी मुंबई येथे महाजनको च्या प्रकाश गड कार्यालयात महाजनको चे मॅनेजिंग डायरेक्टर संजय खंडारे एच आर चार चे व्यवस्थापकीय संचालक पुरूषोत्तम जाधव , तसेच एच आर व्यवस्थापक मंथा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेले आहे कोविड १९ परिस्थितीत वारंवार मुख्य अभियंता खंडारे व उपमुख्य अभियंता पुणेकर यांची वारंवार भेट घेऊन स्थानिकांच्या सुरक्षारक्षकांच्या कामा याबाबत विचारणा केली असता त्यांनी होकार दर्शवला आहे परंतु सध्यस्थितीत कोविड १९ परिस्थितीत दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राची कॉलनी ची सुरक्षा तसेच पाईप लाईन व राखेच्या बंडा कडील जाणाऱ्या पाईप लाईन ची सुरक्षा वाऱ्यावर आहे स्थानिकांचा रोजगार गेल्याने ते आता आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे त्यासाठी त्यांनी त्यांना न्याय मिळावा म्हणून शिवसेनेचे भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी निवेदन सादर केले .
प्रसंगी त्यांनी महाराष्ट्र विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सदर सुरक्षारक्षकांच्या बाबतीत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती केली त्यात त्यांनी सांगितले की सर्व स्थानिक 150 सुरक्षारक्षकांचा रोजगार यामुळे गेलेला आहे याची सर्वस्वी जबाबदारी दिपनगर प्रशासनाची आहे तरी सदर चाडे का जर आपण एमएसएफ कंपनीला देत असाल तरी जे सुरक्षा रक्षक यापूर्वी तिथे काम करत होते त्यांनाच कामावर ठेवण्यात यावे अन्यथा कोविडक-१९ च्या परिस्थितीतही शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व स्थानिकांना तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल सदर बाबतीत शिवसेनेचे पदाधिकारी व सुरक्षारक्षकांची प्रतिनिधी दीनांक 31 मे रोजी उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर व मुख्य अभियंता खंडारे यांची भेट घेऊन शिवसेनेच्या वतीने तसेच सुरक्षारक्षकांच्या वतीने निवेदन सादर करणार आहेत सदर निवेदनाची दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईलने मोठ्या प्रमाणावर दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात आंदोलन उभारले
जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा सदर वेळी देण्यात आला . शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांचेसह सुरक्षारक्षकांच्या प्रतिनिधी श्रीकांत निकम, सतीश पाटील, राजेंद्र राजपूत ,धनराज वारके ,प्रकाश मराठे, दिनेश सुरवाडे, राहुल फिरके, अनिल पाटील, संतोष जाधव ,सचिन सुरवाडे, राहुल जावळे ,नितीन सुरवाडे ,संजय पाटील, रोशन सुरवाडे ,राजेंद्र राणे, किशोर पाटील ,वैभव महाजन ,अमोल चौधरी, प्रवीण पाटील, दिपक माळी, सतीश सुरवाडे, ईश्वर झोपे, गौरव मेढे ,भगवान माळी ,विशाल गायकवाड ,रुपेश सोनवणे ,हेमंत तायडे ,आकाश पाटील ,आकाश सुरवाडे, पंकज चौधरी, हे उपस्थित होते. यांनी यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांचेकडे न्याय मिळावा यासाठी निवेदन दिले व सहकार्याची मागणी केली समाधान महाजन शिवसेना तालुका प्रमुख भुसावळ यांनी ती मागणी मान्य करून सदर स्थानिक सुरक्षारक्षकांना त्यांचा रोजगार मिळवून देण्यासाठी शिवसेना भुसावळ तालुक्याच्या वतीने पालक मंत्री जळगाव नामदार गुलाबराव पाटील , मुक्ताईनगर तथा जिल्हा प्रमुख शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने व शिवसेना भुसावळ तालुका सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केले जाईल , अशी ग्वाही दिली . प्रसंगी शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख उत्तम सुरवाडे , विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धीरज पाटील , अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी यांच्याशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असे सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *