भुसावळात पिस्टलचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तीघा आरोपींना अटक –


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील पंधरा बंगला परिसरात जलाल शहा दर्गा जवळ विनापरवाना बनावटी पिस्टल ताब्यात बाळगून दहशत निर्माण क़रणाऱ्यां तीघा आरोपींना बाजारपेठ पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी संयुक्त कारवाई करून दिनांक २९ रोजी ताब्यात घेतले आहे.
शहरात पंधरा बंगला परिसरात जलाल शहा दर्गा जवळ दिनांक २९ रोजी ६ . ४५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी वकील खान उर्फ ओल्ड शकील खान होलिया मज्जिद जवळ भुसावळ येथे विनापरवाना १५,००० रुपये किमतीची बनावटी पिस्टलसह मिळून आला. गुन्ह्यातील अफाक अख्तर पटेल वय २५ राहणार पटेल कॉलनी खडका रोड भुसावळ.अदनान शेख युनूस वय २५ राहणार आगाखान वाडा मटन मार्केट भुसावळ.वकील खान उर्फ गोल्डी शकील खान वय ३० राहणार न्यू दर्गा होलिया मज्जिद जवळ भुसावळ अशांनी दिनांक 28 रोजी भुसावळ शहरात पंधरा बंगला परिसरात पिस्टल बाळगून त्यांचा धाक दाखवून दहशत केली व ती पिस्टल अफाक पटेल याने अदनान शेख यांच्या हस्ते वकील खान उर्फ गोल्डी शकील खान यांच्या ताब्यात दिले म्हणून
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी पो.कॉ. विकास सातदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
गुरुन २२५/२०२१ भा.द वि शस्त्र अधिनियम कलम ३/२५,२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे , यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत तसेच स्थानिक गुन्हे शाखा जळगाव निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अशांनी मिळून संयुक्त कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील बाजारपेठचे सपोनि कृष्णा भोये करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *