रावेर –

मुक्ताईनगर मतदारसंघातील (रावेर विभाग) तालुक्यातील निंभोरासिम, विटवा,निंबोल ऐनपूर,सुलवाडी, कोळदा,धामोडी,वाघाडी,रेभोटा, शिंगाडी, कांडवेल या भागात गुरुवारी दिनांक 27 दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रावेर तालुक्यातील 12 पेक्षा जास्त गावांना जोरदार तडाखा दिला.या वादळामुळे अनेक गावांमध्ये घरावरील पत्रे उडाली.ठिकठिकाणी झाडे तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.कापणीला आलेल्या केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले.खिर्डी ऐनपूर रोडवर चीच फाट्यावर येथे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती.
पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केळी बाग नुकसान ग्रस्त शेती ऐनपूर येथे भेट दिली असता शेतकरी यांना केळी बागांचे झालेले नुकसान तात्काळ सरसकट पंचनामे करण्यात यावे असे उपस्थित कृषी अधिकारी यांना सुचविले.तसेच शेतकरी यांनी पीकविमा मिळाले नसल्याचे सांगत ते आधी वेगळी कंपनी होती ही आत्ता नवीन बजाज कंपनी असून त्यासंदर्भात बोलणे झाले आहे तरी पीकविमा मिळण्यासाठी प्रयन्तशील राहू अशी ग्वाही पालकमंत्री यांनी यांनी दिली.व रस्ता संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता ऐनपूर सुलवाडी हा रस्ता पूर्वीपासून मंजूर असून लवकरच त्या कामाला सुरुवात होईल असे आश्वासन दिले.ज्या कॉन्ट्रॅक्टरला हा रस्ता दिला आहे त्यांच्याशी त्यांनी तेथुनच फोनवर बोलून सोमवारपासून कामाला सुरुवात करावी असे सांगितले.परवा झालेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात केळी बागांचे नुकसान झालेले आहे अनेक घरांचे छप्पर उडालेले असून त्यांचे संसार उघड्यावर आलेले आहेत व अनेक झाडे कोलमडून पडलेली आहेत परवाच्या चक्रीवादळामुळे एवढे मोठे नुकसान या भागात झालेले असून रावेर विभागात व मुक्ताईनगर मतदारसंघात अंदाजे 100 कोटी चे नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या केळी बागा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेले आहेत दोन दिवसांपूर्वी केळीला चांगला भाव होता परंतु आज या चक्रीवादळामुळे या शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागत असून त्यांना आपली केळी अतिशय कमी भावात विकावी लागत आहे, व्यापारी खुप कमी किमतीत केळी घेत आहेत अकराशे ते तेराशे प्रतिक्विंटल असलेले केळी आज वापसी मध्ये 300 ते 400 प्रतिक्विंटल व्यापारी घेत आहे.सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी ना.गुलाबराव पाटील यांनी केली.ऐनपूर,सुलवाडी, कोळदा, धामोडी,परिसरात येथे नुकसानग्रस्त घरे, नागरिक,शेतकऱ्यांना त्वरित शासना मार्फत योग्य ती मदत तातडीने पंचनामे करून लोकांना पुरवली जाईल असे आश्वासन व ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्यासोबत मुक्ताईनगर मतदारसंघा चे आमदार चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित सर्व अधिकारी वर्ग तहसीलदार उषाराणी देवगुने, डेप्युटी इंजिनिअर चौधरी, सपकाळे, मंडळ अधिकारी मीना तडवी मॅडम, ऐनपुर गावाचे सरपंच, उपसरपंच, तलाठी,ग्रामसेवक,जेष्ठ शिवसैनिक छोटू पाटील,सुभाष महाजन, तुषार कचरे,अमोल पाटील,विनोद पाटील ,भैय्या पाटील व शेतकरी वर्ग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


