मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानीची पालकमंत्री उद्या करणार पाहणी ;

जळगाव :
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवार, 29 मे, 2021 रोजी जिल्हा दौर्‍यावर असून सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढाळदे, उंचदा, शेमळदे व इतर ठिकाणी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधला. दुपारी 12 वाजता रावेर तालुक्यातील विटवा, निंबोल, ऐनपुर व इतर ठिकाणी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व शेतकर्‍यांशी ते संवाद साधतील. दुपारी चार वाजता धरणगाव तालुक्यातील नियोजित कार्यक्रमांना उपस्थिती देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *