जळगाव –

भुसावळ. दावते इस्लामी हिंद च्या मदरसा जमीअतुल मदिना येथून “आलीम” ची सनद घेतलेले
विद्यार्थी हि आता मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ हैद्राबाद येथुन एम.ए. मध्ये प्रवेश घेऊन पदव्युत्तर उच्च शिक्षण घेऊ शकतात .असे दावते इस्लामी चे मौलाना शारीक मदीना यांनी सांगितले. मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ
दावते इस्लामीचे
मॅडेट, जमीअतुल मदनाची “फजीलत सनद ” पदवी प्रमानेच असल्याने एम.ए. प्रवेशास पात्र मानले जाते.
प्राथमिक स्तरावर, जमीअतुल मदिना च्या शेकडो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणा ला प्रवेश घेण्या चा फायदा होऊ शकेल. त्याअंतर्गत “आलीम” सनद प्राप्त झालेल्या तरुणांना दावते इस्लामी, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ च्या मदरशांमध्ये स्थापन केलेल्या प्रवेश विभागात उच्च शिक्षण कक्ष चालविला जाईल.तसेच विद्यापीठातून एम.ए. प्रवेशासाठी संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल.
शारिक मदनी पुढे म्हणाले की, दरवर्षी शेकडो मुस्लिम तरुण दावते इस्लामी च्या मदरश्यान वरच अवलंबून असतात त्यांच्यासाठी सुद्धा आता समकालीन उच्च शिक्षण घेण्याची व्यवस्था किंवा मुख्य प्रवाहातील शिक्षणा ची व्यवस्था होणे हि आनंदाची बाब आहे. आपण उच्च शिक्षण देखील प्राप्त करू शकता.
देशभरात सध्या शेकडो इस्लामी मदरसे सुरू आहेत यात विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणा बरोबर समांतर शिक्षण हि दिले जाते. जमीअतुल मदिना येथे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मुक्त शिक्षण शिक्षण संस्था (एनआयओएस) व दावते इस्लामी हिंदच्या मदरसा च्या विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तराचे शिक्षण प्रदान करणे.
व दहावी , बारावीच्या परीक्षा घेण्या ची व्यवस्था केली जाते.
दावते इस्लामी च्या
मदरशां मधून जमीअतुल मदिना मध्ये
युवकानी प्रवेश घेवून धार्मिक आणि आधुनिक व समकालीन
दोघांचे ही शिक्षण घेवून समाज व राष्ट्रा ची सेवा करावी असे आवाहन शरीक मदनी यांनी केले आहे.


