वरणगाव येथे नाकाबंदीत चोरिच्या चार मोटरसायकलीसह दोघे पोलीसाच्या जाळ्यात ;


वरणगाव –
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरु असलेले लॉकडाऊन दरम्यान वरणगाव बस स्थानक चौकात सुरु असलेल्या नाकाबंदीत दोघां मोटरसाइकल चोरांसह चोरिच्या चार मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे
जिल्हयात सर्वत्र संचारबंदी दरम्यान वरणगाव बस स्थानक चौकात पोलीस नाकाबंदी करीत असतांना विना कारण मोटर सायकलीवर फिरत असलेल्या दोघाना पोलिसांनी चौकशी करीत गाडीचे कागद पत्राची मागणी करताच दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीसानी दोघांना ताब्यात घेऊन कसुन तपासणी केली असता मोटरसाइकल चोरीची असल्याची कबुली दिली .
कोरोनाच्या काळात सर्वत्र संचार बंदीचे आदेश असल्याने विना कारण फिरणाऱ्याची वरणगाव पोलीस नियमाप्रमाणे दि २७ गुरुवार रोजी बस स्थानक चौकात नाकाबंदी करतांना ये जा करणाऱ्याची चौकशी व गाडीची तपासणी करीत असताना विना नंबरची मोटरसायकल वरील दोघाची चौकशी करीत असताना गाडीच्या कागदपत्राची मागणी करताच दोघा कडून उडवा उडवीचे उत्तर मिळताच पोलीसाना शंका आल्याने त्या दोघांना पोलीस स्टेशनला आणुन त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता मोटरसायकल चोरीची असल्याची कबुली त्या दोघानी दिली व आणखी तीन मोटरसायकल आम्ही हतनुर (ता भुसावळ ) येथे लपवुन ठेवल्या असल्याचे सागताच पो ना कॉ मजहर पठाण , पो कॉ योगेश जोशी , पो कॉ पराग दुसाने व सह फौजदार इस्माईल शेख यांनी हतनूर येथे जावुन एक लाल रंगाची गॅल्यामर , बजाज कंपणीची बॉक्सर , हिरो कंपणीची काळ्या रांगाची स्पलेडर ,व एक हिरो होडा कंपनीची ड्रिमयूगा अशा चार मोटर सायकली त्यांच्या कडून हस्तगत करण्यात आल्या . याप्रकरणी संशयीत आरोपी संतोष रघुनाथ चौधरी , विष्णु रमेश सुरवाडे दोघे रा हतनुर यांना अटक करण्यात आली असुन त्याच्या कडून आणखी काही चोरीच्या गाडया मिळन्याची शक्यता असल्याने पोलिस कसून चौकशी करीत आहे .
याबाबत अधिक तपास पोलीस नाईक मजहर पाठण हे करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *