भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाची 2 मे 2019 रोजी दुचाकी चोरीला गेली मात्र ही दुचाकी दोन वर्षानंतर आता जळगाव एमआयडीसी पोलिसांना सापडली आहे. त्यामुळे येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आठवडे बाजारात छायाचित्रकार अमजद खान वहीब खान (रा.भुसावळ) हे 2 मे 2019 गेले असता त्यांची दुचाकी (एम.एच.19 ए.एस.3400) ही अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. जळगाव एमआयडीसी पोलिसांनी चोरटा मुकुंदा सुरवाडे (रा.मेहरूण) याला पकडल्यानंतर त्याने विशाल इखे, गोपाळ राजेद्र पाटील (रा.चिंचोली, ता.जळगाव) यांच्या मार्फत ज्ञानेश्वर हेंबाडे (रा. चिंचोली) यांना ही दुचाकी विक्री केली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार दीपक जाधव पुढील तपास करीत आहे.



