वरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा थांबलेल्या विकास कामांना गती मिळावी ; राष्ट्रवादी काँग्रेस वरणगाव शहरातर्फे मागणी ; मुख्याधिकारी यांना दिले निवेदन;

वरणगाव

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा व वरणगाव शहरातील थांबलेल्या विकास कामांना गती देण्यात यावी या मागणीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरणगाव शहरातर्फे निवेदन देण्यात आले .

सध्या वरणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून ८ते१०दिवसाआड शहराला पाणीपुरवठा होत आहे. तापी नदी मध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असताना मानवनिर्मित पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. शहरांमध्ये तीन ते चार दिवसांनी होणारा पाणी पुरवठा हा नियोजन शून्य कारभारामुळे उशिरा होत आहे.पाणी पुरवठा उशिरा होण्यामागे याच्या मागे कोण आहे?वरणगाव शहरासाठी ७ वर्षापूर्वी स्वंतत्र पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन तयार झालेली होती.ती पाणी पुरवठा योजना इतक्या कमी कालावधी मध्ये कालबाह्य कशी झाली..?असा संतप्त सवाल नगरपरिषद प्रशासनाला विचारण्यात आला.
▪️वरणगाव शहरातील जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या तिर्थ क्षेत्र नागेश्वर मंदिराचे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भूमिपूजन करून पायखोदकाम झालेले आहे.तरी प्रत्यक्षात कामाला पावसाळ्आधी सुरवात करावी.
▪️प्रभाग क्रमांक १८मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे सामाजिक सभागृहाचे कामाची वर्क ऑर्डर जुन२०२० मध्ये दिले असून अजूनपर्यंत सभागृहाचे काम पूर्ण झालेले नाही. सबंधित ठेकेदार काम करत नसल्यास कायदेशीर कारवाई करावी.
▪️प्रभाग क्रमांक १०मधील१८ मीटर च्या रस्त्यांची मोजणी केल्यास काळाची गरज लक्षात घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावण्यात यावे जेणेकरून हिरवळ निर्माण पर्यावरणास पूरक वातावरण निर्माण होईल.
▪️प्रभाग क्रमांक १०मध्ये साई नगर ,हनुमान नगर,मच्छिंद्र नगर, लुंबिनी नगर,महालक्ष्मी नगर परिसरात मोठ्या प्रमाणत काटेरी झाडे झुडपे वाढेलेली असून रात्री अपरात्री साप, जनजनावर निघत असतात त्यामूळे प्रभागांतील नागरिकांना विविध अडचणींनाना सामोरे जावे लागत आहे.
▪️वरणगाव परिसरातील पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यांची सफाई करावी.जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना अडचण होणार नाही.
अशा विविध मागण्यांचे निवेदन आज सोमवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
वरणगाव शहर आणि परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी प्रशासकीय पातळीवर चर्चा करून नागेश्वर मंदिराजवळ (फायर फायटर) ईमारत मध्ये कोविड सेंटर उभारण्यात यावे.या कोविड सेंटर उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपणास सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगांव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी मुख्याधिकारी दिले.
सदरील निवेदन देताना प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगांव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी , माजी नगरसेवक सुधाकर जावळे , युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर पाटील सर, तालुकाध्यक्ष दिपकमराठे ,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू भाई जकातदार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष श्री.मनोज कोलते, भुसावळ तालुका उपाध्यक्ष .मनोज अग्रवाल,प्रकाश नारखेडे, वरणगाव शहराध्यक्ष समाधान चौधरी, उपशहराध्यक्ष कैलास माळी, माजी नगरसेवक .विष्णु खोले, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, माजी नगरसेवक साजिद कुरेशी, तालुका सरचिटणीस .राजेश चौधरी, .महेश सोनवणे,युवक कार्याध्यक्ष .विनायक शिवरामे, डॉ. एहसान अहमद,युवक शहर अध्यक्ष सोहेल कुरेशी, माजी युवक शहर अध्यक्ष .अनिल चौधरी, राजेश इंगळे, इफ्तेखार मिर्जा,शेख रिजवान ,ओबीसी सेल वरणगाव शहराध्यक्ष हिमालय भंगाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *