नवजात बाळासह पाच वर्ष वयोगटातील बालकांची हृदयावरील शस्त्रक्रिया होणार मोफत ; भुसावळ तालुक्यातील गरजू पालकांनी आपले मानवाधिकार फाऊंडेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
जन्मजात नवजात बालकासह पाच वर्ष वय असलेल्या बालकांवर हृदयाची शस्त्रक्रिया वा अन्य शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास अशा बालकांवर आपले मानवाधिकार फाऊंडेशन व अन्य संस्थांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कार्यासाठी फाऊंडेशनचे भुसावळ तालुकाध्यक्ष मयूर राजेंद्र अंजाळेकर यांनी पुढाकार घेतला असून आतापर्यंत दोन बालकांवर त्यांनी माध्यमातून शस्त्रक्रिया करून आणल्या आहेत.
आपले मानवाधिकार फाऊंडेशनची मोलाची भूमिका
फाऊंडेशनचे भुसावळ तालुकाध्यक्ष मयूर राजेंद्र अंजाळेकर या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, नवजात बालकांवर विविध कारणांमुळे हृदयाची वा अन्य शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो मात्र अनेकदा पालकांची परीस्थिती साधारण असल्याने अडचणी येतात मात्र वैयक्तिकरीत्या, आपले मानवाधिकार फाऊंडेशनच्या माध्यमातून तसेच अन्य संस्थांच्या सहकार्यातून या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात शिवाय विविध योजनांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणार्‍या पैशांची मदत केली जाते व त्यासाठी योग्य ते मार्गदर्शनही केले जाते. केवळ भुसावळ शहर व तालुक्यातील नवजात बालकासह पाच वर्ष वयोगटापर्यंत बालकांसाठी ही मदत केली जाणार असून गरजूंनी अधिक मदत व माहितीसाठी 9172800740, 9503900740 वर संपर्क साधावा, असे आवाहन मयूर अंजाळेकर यांनी केले आहे.
योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी या कागदपत्रांची गरज-
बाळाचे शून्य ते पाच या वयोगटात असावे
बाळाचे बालआधार कार्ड
बाळाच्या पालकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड
बाळाच्या पालकाचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड
नवजातबाळासोबत आई-वडीलांचा फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *