बाजारपेठेच्या गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे पोलिसांच्या जाळ्यात ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील बाजार पेठ पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यातील फरार तीघे आरोपी स्थानिक गुन्हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग -५ गुरुन २१७ /२०२१ व २१८/२०२१ कलम ३७९ मधील दाखल गुन्ह्यातील आरोपी विशाल मधुकर इखे वय २४ राहणार चिचोली तालुका जळगाव , गोपाल राजेंद्र पाटील वय २३ राहणार चिचोली तालुका जळगाव , ज्ञानेश्वर शिवाजी हेमाडे वय ३० राहणार चिंचोली तालुका जळगाव, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार झाले होते. सदर गुन्ह्यातील आरोपी शहरांमध्ये फिरत असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यावरून पथकाला बोलावून माहिती दिली त्यावरुन सापळा रचून आरोपीतांना ताब्यात घेतले व भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दिनांक २३/५/२०२१ रोजी जमा करण्यात आले आहे.
सदरची कारवाई सहाय्यक फौजदार अशोक महाजन ,शरीफ काझी,पोलीस नाईक युनुस शेख, किशोर राठोड ,पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील ,रणजित जाधव यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *