वरणगाव ,-

वरणगाव येथील अक्सानगर मधील रहिवाशी असलेल्या विवाहितेने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि २२ शनिवार रोजी घडली होती मात्र मयत महिलेचे वडिलांच्या तक्रारीनुसार पती व सासु , सासऱ्या विरोधात वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलीसानी दिलेल्या माहीतीनुसार असे की सावदा येथील मोहम्मद खालीद मोहम्मद शफी यांची मोठी मुलगी रूखसारबी ( २२ ) हिचा विवाह वरणगाव येथील उसमानखान मोहम्मद खान यांच्या मुलगा शाहरुख खान यांच्याशी दि ३० एप्रील२०१९ ला धार्मिक विधी प्रमाणे पार पाडला होता लग्न झाल्या नतंर थोडयाच दिवसानी रुखसानच्या घरच्या मंडळीनी तिला मानसिक व शारीरीक त्रास देत असल्याने तीने तीच्या आई जवळ व घरातील मंडळी जवळ सासरच्या जाचा बद्दल सांगितले होते .परंतु काही दिवसांनी ते सुधारतील या आशेने माहेर कडील मंडळीने त्याकडे दुर्लक्ष केले .6 फेब्रु .21रोजी तिला मुलगा झाला . आता तरी त्रास कमी होईल अशी आशा होती .परंतु तिचा त्रास वाढतच गेला व शेवटी तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले . या घटनेस तिचा पती शाहरूखखान , जवराबी (सासु ) ' उस्मान खान ' ( सासरे ) , मुस्त मीनखान (दीर ) ' सर्व राहाणार वरणगांव ' तसेच नाजमिनबी (नणंद ,रसलपुर ) इ . ना जबाबदार धरून त्यांचेवर योग्य कारवाई व्हावी अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी दिल्याने वरणगांव पोलीसांत त्यावरून सासरच्या मंडळीविरुद्ध भा द वी कलम ३०६/४९८/ ए / ३४प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .


