भुसावळात लॉकडाउनच्या पार्श्वभूमिवर पोलिसांचे कोम्बिंग ऑपेरेशन ;

भुसावळात पोलिसांचे कोम्बिंग ऑपेरेशन ;
भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरामध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शुक्रवार रोजी रात्री अर्थात दि. 21 मे रात्री 11 ते 22 मे च्या पहाटे 4वाजेपर्यंत शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले .
सध्या स्थिती मध्ये सुरू असलेल्या कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे त्याचप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती मिळावी, रेकॉर्डवरील हिस्ट्री सीटर चेक करणे, रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार चेक करणे, तसेच गुन्हेगारांवर निगराणी ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने सदरचे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली –
विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना वॉन्टेड असणारे 18 गुन्हेगार चेक केले. त्यापैकी 3 आरोपी मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आले. रात्रीच्या वेळी 3 वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा करण्याच्या उद्देशाने व संशयित रित्या फिरणाऱ्या तीन इसमांना ताब्यात घेऊन, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले. पैकी 2 गुन्हे हे शहर भुसावळ शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले असून 1 गुन्हा बाजारपेठ पोलीस स्टेशन ला दाखल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56 खाली तडीपार करण्यात आलेल्या एकूण आठ गुन्हेगारांना चेक करण्यात आले. ते घरी मिळून आले नाही.
एकूण 14 हिस्ट्री सीटर चेक करण्यात आले. त्यांना चांगल्या वागणुकीची समज देण्यात आली.
एका हॉटेल वर रात्री उशिरा सुरु ठेवल्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 w प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला..
एकूण 9 जेल रिलीज गुन्हेगार चेक केले. त्यापैकी 3 आरोपिंवर प्रतिबंधक कारवाई केलेली नसल्याचे दिसून आल्याने त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
भादवी 188 खाली भुसावळ शहर पोलिस स्टेशनला एक गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, कृष्णा भोये, गणेश धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुनगुहू तसेच दोन्ही पोलीस स्टेशन चा स्टाफ, पोलीस मुख्यालय येथील एक आरसीपी पथक यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *