खडवली आणि वासिंद दरम्यान रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक ;

खडवली आणि वसिंद दरम्यान रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक ;
मुंबई –
मध्य रेल्वे मुंबई विभाग रोड क्रेन वापरुन खडवली आणि आटगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील आरएच गर्डर काढण्यासाठी रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक संचालित करणार आहे. ब्लॉकचे तपशील खालीलप्रमाणे आहेतः
लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ६१ (खडावली व वसिंद दरम्यान) आणि क्रमांक ६८ (आसनगाव व आटगाव दरम्यान) येथे आरएच गर्डरच्या उभारण्यासाठी.
ब्लॉकची *दि. १९.५.२०२१ (मंगळवार/बुधवार मध्यरात्र) रोजी ००.५० वाजेपासून ०४.५० वाजेपर्यंत असेल .
*ट्रॅफिक ब्लॉक विभाग* : टिटवाळा ते आटगाव दरम्यान अप आणि डाऊन लाईन्स.
मेल / एक्स्प्रेस गाडीचे वेळापत्रकाचे पुनःनिर्धारण
02106 गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी दि. १८.५.२०२१ रोजी २ तास (निर्धारित वेळ १४.४० वाजता) पुनःनिर्धारित करण्यात आली आहे.
अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्शन
मुंबईकडे येणा-या खालील मेल / एक्स्प्रेस विशेष गाड्या जळगाव – सूरत मार्गे वळविण्यात येतील आणि कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी भिवंडी रोड स्थानकात थांबा देण्यात येईल.
१. 02104 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल (दि. १७.५.२०२१ रोजी सुटणारी)
२. 02810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (दि. १७.५.२०२१ रोजी सुटणारी)
अप मेल / एक्सप्रेस गाड्यांचे नियमन –
दि. १९.५.२०२१ रोजी मुंबईकडे येणा-या खालील अप मेल / एक्स्प्रेस गाड्या ब्लॉकच्या कालावधीत नियमित केल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा २ ते ३ तास उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.
१. 02102 हावडा – लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल
२. 01074 प्रतापगड लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
३. 05547 रक्सौल लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
डाऊन मेल / एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
दि. १८.५.२०२१/१९.०५.२०२१ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस/छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार्‍या खालील डाऊन मेल/एक्स्प्रेस विशेष गाड्या ब्लॉकच्या कालावधीत नियमित करण्यात येतील.
१.02141 लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलिपुत्र विशेष
२.02193 मुंबई वाराणसी विशेष
३.02538 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर विशेष…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *