भुसावळ (प्रतिनिधी ) –
क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती निमित्त कोरोनाची पार्श्वभूमि लक्षात घेवून समाजभूषण नगरसेवक महेन्द्रसिंग ठाकुर उर्फ पिंटूभाऊ यांच्या सौजन्याने रुग्णवाहिके (अॅम्बुलन्स)चे लोकार्पण
आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते उद्या दिनांक ९ मे रोजी सकाळी ९ वाजता क्रांतीसूर्य महाराणा प्रताप चौक, वसंत टाॅकिज परिसरात करण्यात येणार आहे .
सर्व समाज बांधवानी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा जयंती निमित्त चौकात गर्दी करू नका व आपआपल्या घरीच जयंती साजरा करा असे आवाहन राजपूत समाज भुसावळ शहर तालुक्याचे वतीने करण्यात आले आहे



