वरणगांव आयुध निर्माणीत कोवीड लसीकरण सुरू ;


वरणगाव (प्रतिनिधी )-
वरणगांव आयुध निर्माणी वरणगावमधील कर्मचाऱ्यांसाठी आपल्या आयुध निर्माणी हाॅस्पीटलमध्ये कोविड-१९ चे स्वतंत्र लसीकरण केंद्र स्थापन व्हावे यासाठी इंटक , भा. म संघ , कामगार युनियन व इंडी पेंडेट युनियन या चारही संघटनांनी व्यवस्थापनाकडे मागणी केली होती , अखेर अॅडमिन ऑफिसर अंबाती व संघटना प्रतिनिधी , खा रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे , सत्यपाल राजपुत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून, शल्य चिकीत्सक यांच्या कडून याबाबत मान्यता मिळविली . आज प्रत्यक्षात लसीकरणाचे उदघाटन फॅक्टरीचे महाप्रबंधक एस.के राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले , याप्रसंगी युनियन असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थीत होते , मेन हास्पीटल येथे सुरू झाले असुन ४५ वर्षाच्या वर ,तसेच दुसरा डोस , वयोवृध्द , इस्टेट निवासी यांना प्राधान्य देण्यात आले , आज १०० नागरिकांनी लसीचा लाभ घेतल्याचे वृत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *