पश्चिम बंगालात २८ भाजपा कार्यकर्त्यांचा खूनाच्या निषेधार्थ वरणगांवात भाजपाची निदर्शने ; पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा – जिल्हाउपाध्यक्ष ऍड ए.जी.जंजाळे.


वरणगाव (प्रतिनिधि ) –
पाश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीत विजया मुळे बेभान झालेल्या तृणूमुल काँग्रेस गुंडांनी भारतीय जनता पार्टी च्या २८ कार्यकर्त्यांचा निर्घृण खून केला महिलांवर अत्याचार करुन बलात्कार केले अश्या प्रकारची घटना ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे यांच्या निषेधार्थ वरणगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी तृनुमूल काँग्रेसच्या गुंडांच्या विरुद्ध निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या तसेच भाजपाच्या २८ कार्यकर्त्यांच्या निर्घृण खून करणाऱ्या तृणूमुल काँग्रेसच्या गुन्हेगारांना यावेळी फाशी देण्यात यावी व पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी निदर्शने वेळी डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी,भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई,जिल्हा उपाध्यक्ष ऍड ए.जी.जंजाळे,महिला मोर्चा शहाराध्यक्ष सौ.प्रणिता पाटील चौधरी,मनोहर सराफ’ सरचिटणीस गोलु राणे,कुंदन माळी,भाजपा शहराउपाध्यक्ष हितेश चौधरी,सरचिटणीस आकाश निमकर,तेजस जैन, शामराव धनगर,माजी सरपंच सुभाष धनगर,गजानन वंजारी, रमेश पालवे,कृष्णा माळी,संदीप माळी,योगेश माळी,मिलिंद भैसे,भाऊलाल टिंटोरे,दीपक चौधरी,मितेश पाचपोळ,राहुल जंजाळे, उपाध्यक्ष पप्पू ठाकरे,दीपक पुंडलिक चौधरी,गोलू वंजारी, जय चांदणे,कमलाकर मराठे,यधनेश पाटील,योगेश काळे,संतोष कश्यप,चेतन वंजारी,अल्पसंख्यक अध्यक्ष डी.के.खाटीक,गजानन वाघ,अनिकेत चांदखेडकर,जयेश कपाटे, गणेश चौधरी यांनी केली..
गजानन वंजारी यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या खुनाचा निषेध करून भाजपाच्या नेत्याबद्दल सोशल मीडियावर एकेरी भाषेत उल्लेख करण्यात येऊन गलिच्छ टीका टिप्पणी केली जाते त्यावर पोलीस प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्यात यावी अन्यथा कायदा सुव्यवस्था सुयोग्य राहावी यासाठी दोषी वर कार्यवाही करावी अन्यथा जसाच तसे उत्तर दिले जाईल असे गजानन वंजारी यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला यावेळी इशारा दिला.
भाजयुमो शहराध्यक्ष यांनी यावेळी यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या कैसालाही धक्का लागल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *